मुंबई – अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) तिच्या हॉट आणि बोल्ड लुकमुळे अधिक करून ओळखली जाते. वयाच्या 49 व्या वर्षामध्ये देखील तिचे फिटनेस आणि सौंदर्य तरुणांना लाजवेल असे आहे. मलायका सोशल मीडियावर नेहमीच तिच्या हॉट अंदाजातील फोटो शेअर करत असते. तिचे हे फोटो चाहत्यांच्या देखील चांगलेच पसंतीस पडत असल्याचे पाहायला मिळते. नुकतेच तिने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
मलायका अरोराने इनस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने काळ्या आणि पांढऱ्या रंगाचा गाऊन परिधान केला आहे. यात ती तिची परफेक्ट फिगर फ्लॉंट करताना दिसत आहे. याशिवाय तिने एका पेक्षा एक पोज देत चाहत्यांना देखील घायाळ केले आहे. मलायका अरोराचा हा क्लासी लूक चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे. या लूकमध्ये अभिनेत्री कमालीची हॉट आणि ग्लॅमरस दिसत असून मलायकाचे हे फोटो आणि व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहेत.
View this post on Instagram
परंतु एकदा मलायकाला तिच्या काही लुक ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागतो. मात्र ती याच्याकडे दुर्लक्ष करताना दिसते. दरम्यान, अरबाज सोबत घटस्फोट घेतल्यानंतर ती अर्जुन मागील काही वर्षांपासून डेट करत आहे. अनेकांना त्यांची जोडीही आवडते. मात्र अद्याप त्यांनी लग्न केलेले नाही. काही दिवसांपूर्वी तिच्या आणि अर्जुन कपूरच्या (Arjun Kapoor) ब्रेकअपच्या बातम्याही सातत्याने येत होत्या. मात्र यात काहीही तथ्य नसल्याचे समोर आले. कारण या चर्चा सुरू झाल्यानंतर हे दोघेही लेट नाईट डिनर डेटवर गेल्याचे म्हंटले जात होते.