मुंबई – गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री मलायका अरोरा आणि तिचा कथित बॉयफ्रेंड अभिनेता अर्जुन कपूर यांच्या लग्नाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. त्यांच्या लग्नाची तारीख, ठिकाण निश्चित झाल्याच्या बातम्या सुध्दा आल्या आहेत. पहिल्यांदा अर्जुन-मलायका 19 एप्रिलला लग्न करणार अशी बातमी आली होती मात्र तसं झालं नाही. त्यानंतर आता ते जून महिन्यात लग्न करणार अशा अफवा सुद्धा होत्या. त्यानंतर आता स्वतःहा मालयकाने एका रिऍलिटी शोमध्ये बोलताना याविषयी माहिती दिली आहे.
View this post on Instagram
Happy bday my crazy,insanely funny n amazing @arjunkapoor … love n happiness always
दरम्यान, नेहा धुपियाच्या चॅट शोमध्ये मलायकाने अर्जुनसोबतच्या तिच्या ड्रिम वेडिंगबद्दल सांगितले. यावेळी मालयकाने सांगितले की, ‘माझे ड्रिम वेडिंग बीचवर होणार आणि हे एक व्हाईट वेडिंग असेल. लग्नात मला elie saab gown घालायला आहे. माझी गर्लगँग माझी ब्राईड्समेट असेल. ब्राईड्समेटची प्रथा मला मनापासून आवडते.’असेही तिने सांगितले, तसेच या चॅट शोमध्ये मलायका अर्जुनबद्दलही बोलली की,’मी त्याचे चांगले फोटो घेत नाही, असे अर्जुनला वाटते. तो मात्र माझे बेस्ट फोटो क्लिक करतो, हेही तिने सांगितले.
तत्पूर्वी, मलायका घटस्फोटित आहे. शिवाय तिच्यापेक्षा अर्जुन 11 वर्षांनी लहान आहे. यापूर्वी दोघांनीही मालदीव व्हॅकेशनचे फोटो शेअर करत, या नात्याची जाहीर कबुली दिली होती. या फोटोत मलायका व अर्जुन एकमेकांचा हात हातात घेऊन दिसले होते. याशिवाय दोघांच्या न्यूयॉर्क व्हॅकेशनचे फोटोही व्हायरल झाले होते.