मुंबई – 49 वर्षांची ‘मलायका अरोरा’ (malaika arora) जेव्हा-जेव्हा कॅमेऱ्यासमोर येते तेव्हा ती तिच्या सौंदर्याची अशी जादू निर्माण करते की चाहते बेभान होऊन जातात. यावेळीही असाच काहीसा प्रकार मलायका अरोराने (malaika arora) केल्याचं पाहायला मिळालं.
आजकाल मलायका सतत कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमात आपल्या बोल्ड लूकने फॅन्सला वेड लावताना दिसत आहे. नुकताच मलायका अरोरा ही ‘लॅक्मे फॅशन वीक 2023’ (Lakme Fashion Week 2023) या सोहळ्यात पोहचली. यावेळी मलायका अरोरा हिचा जबरदस्त असा लूक दिसला.
View this post on Instagram
मलायका अरोरा हिच्या लूककडे लोकांच्या नजरा खिळल्या होत्या. यावेळीमलायका अरोराने ब्लेझर आणि ट्राउझर्ससह जोडलेला फ्लोय टॉप परिधान केला होता. यामध्ये तिचा व्यावसायिक दृष्टिकोनासाठी योग्य पद्धतीने दिसत होता.
मलायका अरोरा ही एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे. आणि म्हणूनच यावेळी मलायका श्वेता कपूरची शोस्टॉपर बनली होती. सध्या सोशल मीडियावर अभिनेत्रीचा हा बॉसी लूक चांगलाच व्हायरल होताना दिसत असून, यामध्ये ती कमालाईची हॉट दिसत आहे.