Chhatrapati Sambhaji Raje : राज्यात सध्या एक विधान मोठ्या प्रमाणात व्हायरल(Social Media) होताना दिसून येत आहे. हे विधान आहे संभाजीराजे छत्रपती (Chhatrapati Sambhaji Raje) यांचे. त्यांनी “मला मुख्यमंत्री (Chief Minister) करा, प्रश्न चुटकीत संपवतो,” अशा प्रकारचे विधान केल्याचे समोर आले आहे. त्यांनी केलेल्या विधानाचा व्हिडियो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
सारथीच्या प्रश्नांसाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. याच आंदोलनाच्या आंदोलन स्थळी उपस्थित राहत, संभाजीराजेंनी आंदोलकांची भेट घेतली.त्यावेळी त्यांनी मला मुख्यमंत्री करा, प्रश्न चुटकीत संपवतो, असं वक्तव्य संभाजीराजे छत्रपती यांनी गंमतीत म्हटलं आहे. मात्र त्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात (Maharashtra Politics) चर्चांना उधाण आल्या पाहायला मिळत आहे.
कोल्हापुरात सारथीच्या विविध प्रश्नांसाठी विद्यार्थी आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला संभाजीराजे यांनी भेट देऊन दिवाळीत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. त्यावेळी आमचे प्रश्न सुटले, तर आम्ही आंदोलन मागे घेऊ असे विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. त्यावर संभाजीराजे गंमतीत म्हणाले की, मला मुख्यमंत्री करा, प्रश्न चुटकीत सोडवतो. संभाजीराजेंचा हाच व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
दरम्यान, संभाजीराजे छत्रपतींनी मला मुख्यमंत्री करा, चुटकीत प्रश्न सोडवतो, असं वक्तव्य केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे. परंतु, संभाजीरांजेंनी हे वक्तव्य पहिल्यांदाच केलेलं नाही. यापूर्वीही बीडमध्ये मराठा आरक्षण जनसंवाद यात्रेत बोलताना संभाजीराजेंनी असे वक्तव्य केले होते.