पुणे : एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने साथीदारांसह भर रस्त्यात राडा घातला. आवडत असलेल्या तरुणीला तीच्या मित्रासह रस्त्यात गाठून मारहाण करण्यात आली. यानंतर तरुणीकडील रोकड व मोबाईल जबरदस्तीने चोरुन नेला. याप्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात कृष्णा डोंगरे व त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फिर्यादी 24 वर्षीय तरुणी व कृष्णा पुर्वी एकाच ठिकाणी कामाला होते. तीने काम सोडल्यावर त्याच्याशी संपर्क ठेवला नाही. मात्र कृष्णा तीला सातत्याने प्रेमाची मागणी केली होता. तीने प्रेमास नकार देऊन तु आवडत नसल्याचे वारंवार सांगितले होते. यानंरही कृष्णाने साथीदारांसह फिर्यादी तरुणीचा पाठलाग केला. ती मित्र दिपककुमारसह जोग शाळेपासून चालली असताना त्यांना अडवण्यात आले.
दिपककुमारला पकडून ठेऊन शिवीगाळ करण्यात आली. यानंतर हातातील कड्याने दिपककुमार व फिर्यादीला डोक्यात व पोटात मारहाण करण्यात आली. यानंतर जबरदस्तीने तीचा मोबाईल व रोख रक्कम असा सात हजाराचा ऐवज घेऊन आरोपी पळून गेले. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल यादव करत आहेत.