मुंबई – तमिळ बिग बॉसमधील स्पर्धक रिजा विल्सन हिला स्कीन ट्रीटमेंट खूप महागात पडली आहे. या स्कीन ट्रीटमेंट नंतर तिच्या डोळ्यांच्या खाली सूज आली आहे. रिजाने सोशल मीडियावरून ही गोष्ट सांगितली. त्या पोस्टनंतर अनेकांनी डॉक्टरांचा सल्ला घेण्याची सूचना केली आहे.
ती आपल्या नेहमीच्या डॉक्टरांकडे साधा फेशियल करण्यासाठी गेली होती. मात्र, डॉक्टरांनी आणि त्यांच्या स्टाफने स्कीन ट्रीटमेंट करण्याचा सल्ला दिला. मात्र, ही स्कीन ट्रीटमेंट केल्यानंतर तिच्या डोळ्यांखाली सूज आली.
त्यानंतर हे डॉक्टर आणि त्यांचे स्टाफ आपल्याला भेटण्याचे टाळत असल्याचेही रिजाने म्हटले आहे. तमिळ बिग बॉसच्या पहिल्या सीझनमध्ये सहभागी झालेली रिजा दुसऱ्या सीझनमध्येही गेस्ट म्हणून सहभागी झालेली होती.