मुंबई – दोन दशकांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर ‘गदर’चा दुसरा भाग धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. मागच्या वेळेप्रमाणेच यावेळीही सनी देओल आणि अमिषा पटेल गदर २ मध्ये एकत्र दिसणार आहेत. ‘गदर’ वन रिलीज होऊन बरीच वर्षे उलटली आहेत, पण चित्रपटाचे गाणे आजही नेहमीप्रमाणेच हिट आहेत. ‘मैं निकला गड्डी लेके’ हे गाणे जितके दमदार आहे, तितकीच सनी देओलची नृत्यशैलीही प्रेक्षकांच्या लक्षात राहते.
नुकतंच सनी देओलने आपलय चित्रपटातील गाण्यावर बीएसएफ जवानांसोबत ठेका धरल्याचे पाहायला मिळाले. सनी देओलला समोर पाहून बीएसएफ जवानांनाही काही वेळ मनोरंजनाची संधी मिळाली. सनी देओल आणि जवानांच्या डान्सचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
सीमेवर रात्रंदिवस शत्रूशी लढणाऱ्या या जवानांना तारा सिंहसोबत नाचत-नाचत काही क्षण घालवण्याची संधी मिळाली. ‘मैं निकला गड्डी लेके’ हे गाणे वाजत असताना आणि तारा सिंग समोर उभा असताना जवानांनाही राहवलं नाही आणि त्यांनी या गाण्यावर डान्स सुरु केला. हा बीएसएफ जवानांचा व्हिडिओ जाहिद हसन नावाच्या ट्विटर हँडलने शेअर केला आहे.
Unlimited Masti without 28% GST!😜
Sunny Paaji rocking the stage with our real heroes #BSF… #SunnyDeolWithBSF #GuruGramViolence 3rd August #Abhisha #MuslimsUnderAttack #JailerShowcase #FukraInsaan #TeJran #31YearsofAjithkumar pic.twitter.com/Ukgkf7wJCR— Zahid Hasan (@ZahidHa68) August 2, 2023
चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सनी देओल बीएसएफच्या या कॅम्पमध्ये पोहोचला होता, यावेळी खूप धमाल-मस्ती झाली. सनी देओलने बीएसएफ जवानांशीही चकमक दिली. यावेळी ‘मैं निकला गड्डी लेके’ ची नवीन आवृत्ती रिलीज करण्यात आली, ज्यावर सनी देओल आणि बीएसएफ जवानांनी स्टेप बाय स्टेप डान्स केल्याचे पाहायला मिळाले.