मुंबई – ‘दबंग ३’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी मराठमोळी अभिनेत्री सई मांजरेकर प्रसिध्द निर्माते साजिद नाडियादवाला यांचा मुलगा सुभान नाडियादवाला याला सई डेट करतेय अशी चर्चा रंगली आहे.
सई नेहमी सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असते. नेहमी सोशलवर तिच्या फोटोशूट बाबत चर्चा होत असतात मात्र यावेळी सई सुभान नाडियादवाला याला डेट करतेय अशी चर्चा रंगली आहे.
सुभान नाडियादवाला याला सई सोबत अनेकदा लंच-डिनर डेटसाठी एकत्र स्पॉट करण्यात आले आहे. त्यानंतर दोघांमधील नात्याच्या चर्चेला उधाण आले. मात्र या चर्चांवर सईने सांगितले आहे की,’आम्ही लहानपणापासूनचे चांगले मित्र असून एकमेकांना चांगले ओळखतो. त्यामुळे आम्ही एकमेकांनी डेटींग वगैरे काही करत नाही. सुरु असलेल्या चर्चेंमध्ये काही तथ्य नाही.’