साऊथ स्टार अभिनेता महेश बाबू यांची मुलगी सितारा सध्या खूप चर्चेत आहे. ती नुकतीच एका ज्वेलरी जाहिरातीत दिसली आहे. त्यासाठी तिला मोठी रक्कमही देण्यात आली आहे. रिपोर्टनुसार, जाहिरातीत दिसण्यासाठी सिताराला 1 कोटी रुपये मानधन देण्यात आले आहे.
View this post on Instagram
सीताराची पहिली जाहिरात टाइम्स स्क्वेअरमध्ये प्रदर्शित झाली. सिताराचे वडील महेश बाबू आणि आई नम्रता शिरोडकर आपल्या मुलीला ही ओळख मिळाल्याने खूप आनंदी आहेत. एका 11 वर्षाच्या मुलीला 1 कोटी रुपये मानधन मिळाले, तेही इतक्या लहान वयात. अगदी स्टार किड्समध्येही काही मोजकेच आहेत ज्यांना पहिल्यांदाच एवढा मोठा एन्डॉर्समेंट डील मिळाला आहे.
जेव्हा टाइम्स स्क्वेअरमध्ये दागिन्यांची जाहिरात दिसली, तेव्हा सीताराने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली. तिने लिहिले,”टाइम्स स्क्वेअर!! अरे मी अधिक आनंदी होऊ शकत नाही @pmj_jewels हे तुझ्याशिवाय करू शकले नसते”
केवळ सिताराच नाही तर नम्रतानेही सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या. आणि तीने आपल्या लेकीच्या कामाबाबत सांगितले आहे. महेश बाबूने देखील सोशल मीडियावर सिताराबद्दल पोस्ट लिहिली आहे. दरम्यान, सिताराचे आधीपासूनच इंस्टाग्रामवर एक दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. ती आता पीएमजे ज्वेल्सचा चेहरा आहे,