लॉकडाऊनमध्ये महेश बाबू गाळतोय घाम

मुंबई – सुपरस्टार महेश बाबू आणि त्याची पत्नी नम्रता शिरोडकर यांना लग्नाला नुकतेच 14 वर्षे पूर्ण झाली. ही जोडी त्यांच्या प्रेम कहानी आणि जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर एकमेकांना देत असलेल्या समर्थनामुळे चाहत्यांच्या मनावर अधिराज्य करत आहे. महेशबाबूचा फिटनेस फ्रिक बघून पत्नी आणि अभिनेत्री नम्रता शिरोडकर प्रभावित झाली आहे. नम्रताने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

Running to perfection ♥️♥️♥️ daily dose of exercise!! @urstrulymahesh #StayHome #StayFit #Lockdowndiaries

A post shared by Namrata Shirodkar (@namratashirodkar) on

या व्हिडीओत महेश बाबू घाम गाळताना दिसतोय. हा व्हिडीओ शेअर करताना नम्रता लिहिते, ”परिपूर्णतेच्या दिशेकडे धावणे सुरु आहे. व्यायामाचा रोजचा डोस !!  स्टेफिट, लॉकडाऊनडायरी, स्टेहोम.”  असे हॅशटॅग देण्यात आले आहेत. दरम्यान, महेश बाबूचा यापूर्वी प्रदर्शित झालेला “भारत एन नेनु’ हा चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. सध्या तो “महर्षी’ चित्रपटाच्य शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यात पूजा हेगडे मुख्य भूमिका साकारत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.