शिक्रापूर – कासारीसह (ता. शिरूर) निमगाव म्हाळुंगी लघु वितरीकेतून चासकमानचे पाणी सोडण्याची मागणी कासारीच्या सरपंच सुनिता भुजबळ यांनी निवेदनाद्वारे चासकमानच्या शाखा अधिकाऱ्यांकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, डीवाय 13 या लघुवितरिकेतून चासकमानच्या पाण्याचे आवर्तन सोडण्यात यावे. कासारी गावच्या पिण्याच्या पाण्यासाठी असलेले गावतळे भरून घेण्यात यावे. उन्हाळ्यामुळे सध्या तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असल्याने पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीलाही पाण्याची कमतरता जाणवू लागली असून उभी पिके व जनावरांचा चाराही जळून गेला आहे. यापूर्वी देखील परिसरातील नागरिकांनी पाणी सोडण्याबाबत आपल्याकडे अर्ज केलेला आहे तरीही त्याची दखल घेतलेली नाही.