मुंबई – ‘गौतमी पाटील’ हे नाव सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चांगलच चर्चेत आहे. त्यासोबत चर्चेत आहेत गौतमी पाटीलने केलेल्या डान्सचे व्हिडीओ आणि याच व्हिडीओमुळे आज गौतमी पाटील सगळीकडे चर्चेचा विषय ठरत आहे. डान्स दरम्यान केलेलं अंगविक्षेप यामुळे गौतमीचे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून, नेटकरी देखील तिच्या या व्हिडिओवर जोरदार कमेंटचा वर्षाव करत असतात.
दरम्यान, याच गौतमाची पाटीलला राष्ट्रवादीच्या मंचावर बोलावू नका, अशी तंबीच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांना काही दिवसांपूर्वी दिली होती. तिला आपल्या मंचावर नृत्यासाठी कुणीही बोलावू नये, अशी ताकीदच अजित पवार यांनी यावेळी दिल्याचं दिसून आलं होत. मात्र, अजित पवारांच्या या इशाऱ्यानंतर खुद्द गौतमी पाटीलने आपली भावना व्यक्त करत अजित पवार यांची माफी देखील मागितली होती.
दरम्यान, नुकतंच अजित पवारांनी गौतमीच्या निमंत्रणावर भाष्य केल्याचं दिसून आलं आहे. सध्या अजित पवार यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. त्यांचा हा विडिओ बारामती मधील असल्याचं बोललं जात आहे.
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, ‘लग्नाची तारीख आहे की नाही, त्या दिवशी मला माहिती नाही. यात्रा असेल तर रात्री…रात्री कापा-कापी..रात्री तमाशा…मग यात्रेला पाटीलबाईला बोलवायचं का? असा सवाल करताच कार्यकर्त्यांनी एकच कल्ला केला.
अजित पवार एवढ्यावरच थांबले नाही, तर ‘काय तिचं नाव,… गौतमी… तिला मी मध्ये काही बोललो तर ती म्हणाली, दादांनी मला असं सांगितलं. शेवटी लोकांना, सर्वांना पाहता येईल असं काम करावं एवढंच म्हणणं..’ असं म्हणताच त्यांनी आवरतं घेतलं. त्यांचा हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होत असून, नेकतरी देखील यावर तुफान कमेंट करत आहेत.