नवी दिल्ली -जर्मनीतील आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत महाराष्ट्राचा युवा खेळाडू प्रज्वल सोनवणे याने 17 वर्षे वयोगटात सुवर्णपदकाला गवसणी घातली. बिगरमानांकित असलेल्या प्रज्वलने अंतिम लढतीत बेल्जियमच्या प्रथम मानांकित खेळाडूचा पराभव करून नवा इतिहास रचला.
आंतरराष्ट्रीय स्पर्धेत थेट सुवर्णपदक मिळविणारा प्रज्वल राज्याचा पहिलाच खेळाडू ठरला आहे. योनेकस येथे नुकत्याच झालेल्या या स्पर्धेत जगभरातील 64 नामांकित खेळाडू सहभागी झाले होते.
प्रज्वलची अंतिम फेरीत बेल्जियमच्या बॅप्टिस्ट रोलिनविरुद्ध लढत झाली. प्रज्वलने पहिली गेम 21-12 अशी जिंकली. दुसऱ्या गेममध्ये 21-5 असा विजय मिळवला व विजेतेपदही पटकावले.