नवी दिल्ली – स्टीपलचेसमध्ये अनुभवी मानला जात असलेल्या महाराष्ट्राच्या अविनाश साबळेने एएफआय महासंघ करंडक वरिष्ठ ॲरथलेटिक्स स्पर्धेत पुरुषांच्या पाच हजार मीटर शर्यतीत 13:39.43 सेकंद अशी वेळ नोंदवली व नवीन विक्रम नोंदवला. बहादूर प्रसाद यांनी 1992 साली केलेल्या कामगिरीला साबळेने मागे टाकले.
महिलांच्या 200 मीटर शर्यतीत महाराष्ट्राच्या ऐश्वर्या मिश्राला रजतपदकावर समाधान मानावे लागले. सुवर्णपदक पटकावणाऱ्या हिमा दासपासून (23.63 सेकंद) ती एक शतांश सेकंदाने पिछाडीवर राहिली. आसामच्या अमलान बोरगोहेनने पुरुषांच्या 200 मीटर शर्यतीत 20.52 सेकंद वेळेसह राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली.