मुंबई – कोलकाता नाईट रायडर्स व मुंबई इंडियन्स यांच्यातील आयपीएल स्पर्धेतील लढतीत नितिश राणा व जसप्रीत बुमराह यांनी बीसीसीआयच्या आचारसंहितेचा भंग केला. प्रतिस्पर्धी संघांतील खेळाडूंना उद्देशून हातवारे करणे तसेच शाब्दीक देवाण घेवाण करणे राणा व बुमराहला भोवले आहे. यासाठी पहिल्यांदाच हे घडल्याने बुमराहला केवळ समज देण्यात आली मात्र, राणाकडून ही चुक दोनवेळा घडल्याने त्याला आर्थिक दंड करण्यात आला आहे.
मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात नियम 1 चे उल्लंघन केल्याप्रकरणी हा दंड करण्यात आला असून बुमराहने चूक मान्य केल्यामुळे त्याला दंड करण्यात आला नाही. राणाला सामना रकमेच्या दहा टक्के रकमेचा दंड करण्यात आला आहे.