मुंबई – भारतीय संघात पुनरागमन करायचे हे एकच लक्ष्य माझ्यासमोर आहे. माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आपली ज्या प्रकारे बेस्ट फिनिशर अशी ओळख निर्माण केली तशीच मलाही निर्माण करायची आहे, असा विश्वास दीनेश कार्तिक याने व्यक्त केला आहे.
धोनी निवृत्त झाला आहे व यष्टीरक्षक फलंदाज म्हणून मला संघात पुनरागमन करण्याची संधी आहे. सध्याच्या भारतीय संघाकडून खेळायला मी उत्सूक आहे. मला भारतीय संघात जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा मी क्षमतेपेक्षाही जास्त सरस खेळ करण्याचा प्रयत्न केला आहे. पुढील काळात भारतीय संघ सातत्याने मालिका खेळणार आहे, तसेच ऑस्ट्रेलियातील टी-20 विश्वकरंडक स्पर्धेतही संघ सहभागी होणार आहे, त्यामुळे मला संधी निश्चित मिळेल, असा विश्वासही त्याने व्यक्त केला.
2018 साली निदाहास करंडक स्पर्धेच्या अंतिम लढतीत कार्तिकने अखेरच्या चेंडूवर षटकार मारून भारताला विजय मिळवून दिला होता. त्या सामन्यापासून कार्तिकची फिनिशर अशी ओळख तयार होण्यास सुरूवात झाली. त्यानंतरही त्याने 2019 साली बांगलादेशविरुद्ध पराभव दिसत असतानाही केवळ 8 चेंडूत 29 धावा केल्या होत्या आणि भारताला विजेतेपद मिळवून दिले होते.
त्यामुळेच तो यंदाच्या आयपीएल स्पर्धेत जर कामगिरीत सातत्य राकण्यात यशस्वी ठरला तर त्याला पुनरागमनाची संधी मिळेल, असे भारताचा अनुभवी ऑफ स्पीन गोलंदाज रवीचंद्रन अश्विननेही सांगितले होते.