पणजी :- गोव्यात सुरु असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सुनील चव्हाणच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र रग्बी संघाने शुक्रवारी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत रौप्य पदकाचा बहुमान पटकावला. महाराष्ट्र पुरुष संघाला सलग दुसऱ्या वर्षी उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. हरयाणा संघाने 14-0 अशा फरकाने महाराष्ट्रावर मात केली.
सुनील चव्हाण, प्रशांत आणि बबलू यादव यांच्या सर्वोत्तम कामगिरीच्या बळावर महाराष्ट्र रग्बी संघाने ही कामगिरी केली. महाराष्ट्र संघाने उपांत्य फेरीत ओडीशा संघाला पराभवाची धूळ चारली. महाराष्ट्र संघाने 19-14 अशा फरकाने दणदणीत विजय संपादन केला. मुख्य प्रशिक्षक मीनल पास्ताला यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र संघाने रुपेरी यश मिळवले.
National Games 2023 : वेटलिफ्टिंगमध्ये हर्षदच्या सुवर्णपदकासह तीन पदकांची कमाई…
तलवारबाजीत अभय-गिरीशला कांस्यपदके
गोव्यात सुरु असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आंतरराष्ट्रीय तलवारबाज अभय शिंदे आणि गिरीश जकातेने शुक्रवारी महाराष्ट्र संघाला राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तलवारबाजीत पदके मिळवून दिली. या दोघांनी तलवारबाजी स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी वैयक्तिक कांस्यपदके कमावली.