India’s Anuradha Devi wins silver in ISSF World Cup 2024 : ISSF विश्वचषक 2024 स्पर्धेत पदार्पण करणारी भारतीय नेमबाज अनुराधा देवी हिने इजिप्तमधील कैरो येथे सुरू असलेल्या या जागतिक स्पर्धेत शुक्रवारी रिओ ऑलिम्पिक चॅम्पियन अन्ना कोराकाकी हिचा पराभव करून महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात रौप्य पदक जिंकले.
अनुराधा देवीने अंतिम फेरीत 24 शॉट्सच्या मालिकेत 239.9 धावा केल्या. अनुराधा देवी (33 वर्षे) हिने आठव्या आणि शेवटच्या पात्रता स्थानावरून अंतिम फेरीत प्रवेश केला होता .कोराकाकीने अंतिम फेरीत 241.1 गुण मिळवले, तर कझाकिस्तानच्या इरिना युनुसेमतोवाने 22 शॉट्समध्ये 219.2 गुणांसह कांस्यपदक पटकावले. आशियाई चॅम्पियनशिपमध्ये भारताला ऑलिम्पिक कोटा मिळवून देणाऱ्या रिदम सांगवानने तिच्या 20 शॉट्समध्ये 197.3 गुण नोंदवले आणि चौथ्या स्थानावर राहून पदक गमावले.
Anuradha Triumphs on debut with a #Silver🥈, bags the 1⃣st medal for 🇮🇳 at the ISSF World Cup 2024 🔫
Shooting her way to glory in Cairo, 🇪🇬 in the 10m Air Pistol event. 🎯🇮🇳
Here’s to many more! 🏆 Many congratulations Anuradha Devi 🥳👏 pic.twitter.com/FZrPeXZ8rd
— SAI Media (@Media_SAI) January 27, 2024
अनुराधा देवीच्या या कामगिरीने भारताला ऑलिम्पिक वर्षातील ISSF विश्वचषक स्पर्धेत पहिले पदक (सहापैकी पहिले) मिळवून दिले. याआधी सागर डंगीनेही पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात अंतिम फेरी गाठली होती पण तो सहाव्या स्थानावर राहिला.
इतर भारतीयांमध्ये मनू भाकर महिलांच्या पात्रता फेरीतील पिस्तुल स्पर्धेत 15व्या स्थानावर राहिल्याने अंतिम फेरीत स्थान मिळवण्यात अपयश ठरली. उज्ज्वल मलिक आणि रविंदर सिंग हेही पहिल्या आठमधून बाहेर राहिले. महिलांच्या ट्रॅप स्पर्धेत राजेश्वरी कुमारी 34 गुणांसह 19व्या स्थानावर राहिली.