नवी दिल्ली – सकल राज्यांतर्गत उत्पादनात म्हणजे जीएसडीपीत महाराष्ट्र राज्याने आपला प्रथम क्रमांक कायम ठेवला आहे. त्याचबरोबर तामिळनाडूने दुसरा क्रमांक कायम ठेवला आहे. मात्र तिसरा क्रमांकावरील उत्तर प्रदेशाची जागा आता कर्नाटकने घेतली असून गुजरात चौथ्या क्रमांकावर आला आहे.
राज्याच्या उत्पन्न वाढीत मध्यप्रदेश आणि ओरिसाने गेल्या सहा वर्षात उत्तम कामगिरी केली असून गेल्या सहा वर्षात या दोन राज्याचे उत्पन्न दुपटीने वाढले असल्याची माहिती एका अहवालात समोर आली आहे. इंडिया रेटिंग अँड रीसर्च या संस्थेने जारी केलेल्या माहितीत म्हटले आहे की, गेल्या सहा वर्षात मध्य प्रदेशाने अनेक आघाड्यावर उत्तम कामगिरी केल्यामुळे या राज्याचे उत्पन्न या कालावधीत दुपटीने वाढले.
या अगोदर मध्य प्रदेश पहिल्या दहा क्रमांकात नव्हता. मात्र शिवराज सिंह चौहान यांनी चांगले नेतृत्व दिल्यामुळे आता हे राज्य पहिल्या दहा राज्यांमध्ये सामील झाले आहे. मात्र या काळात केरळची परिस्थिती खराब झाली असून आता केरळ पहिल्या 10 राज्यांमधून बाहेर पडले आहे.
महाराष्ट्र, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरात, पश्चिम बंगाल, राजस्थान, आंध्र प्रदेश, तेलंगणा, आणि केरळ ही राज्य आर्थिक वर्ष 2016 मध्ये पहिल्या दहा क्रमांकात होती. आता पहिल्या 10 राज्यात केरळची जागा मध्य प्रदेशाने घेतले आहे. पहिला आणि दुसरा क्रमांक महाराष्ट्र आणि तामिळनाडूने कायम ठेवला आहे.
तर कर्नाटकने उत्तर प्रदेशाची तिसरी जागा स्वतःकडे घेतले आहे. या कालावधीत गुजरात पाचव्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर आला आहे. करोनानंतर विविध राज्य पूर्व पदावर येण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यातल्या त्यात ओरिसा आणि मध्य प्रदेशाने केलेली कामगिरी वाखानांनी असल्याचे या संघटनेने म्हटले आहे.