Maharashtra Opinion Poll Lok Sabha Election 2024 – देशभरात लोकसभा निवडणुकांची जोरदार तयारी सुरु आहे. महाराष्ट्रत महायुती आणि महाविकास आघाडीत थेट लढत पहायला मिळणार आहे. राज्यातील जागावाटप अंतिम टप्प्यात आले आहे. कोणत्या जागेवर कोण निवडणुक लढवणार हे त्या त्या पक्षातील वरीष्ठ नेत्यांनी ठरवले असून आता केवळ घोषणा बाकी असल्याची माहिती समोर येत आहे. राज्यात पाच टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे.
19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडेल. अशातच राज्यातील कोणत्या मतदारसंघात कोणता पक्ष बाजी मारू शकतो याबाबतचा ओपनिनियन पोल समोर आला आहे. इंडिया टीव्हीने हा पोल जाहीर केला आहे. त्यानुसार कोणाला किती जागी विजय मिळेल हे जाणून घेऊया..
इंडिया टीव्ही- सीएनएक्सच्या ओपिनियन पोलनुसार यंदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रमध्ये भाजपला मोठं यश मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात आहे. तर भाजपपाठोपाठ उद्धव ठाकरेंचा पक्ष राज्यात सर्वाधिक जागा मिळवणारा असेल असाही अंदाज आहे.
मागील दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप-शिवसेनेची युती होती. ज्याचा फायदा त्यांना झाला होता. 2014 आणि 2019 मध्ये शिवसेनेने 18-18 जागा जिंकल्या होत्या. मात्र, आता झालेल्या फुटीचा फटका हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)ला बसू शकतो असा अंदाज ओपिनियन पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे. यंदाच्या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाराष्ट्रात फक्त 8 जागाच जिंकू शकेल असा अंदाज आहे. इंडिया टीव्हीच्या पोलमध्ये अशी आकडेवारी दिली गेली असली तरीही इतर काही पोलनुसार यावेळी राज्यात भाजपचा आकडा 20 च्या खाली जाऊ शकतो.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाराष्ट्रातील कोणत्या जागा जिंकणार?, काय आहे इंडिया टीव्ही – सीएनएक्सच्या ओपिनियन पोलचा अंदाज पहा –
1. हातकणंगले -शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
2. शिर्डी – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
3. रत्नागिरी-सिंधुदुर्ग – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
4. धाराशिव – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
5. छत्रपती संभाजीनगर – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
6. परभणी – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
7. नाशिक -शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
8. मुंबई दक्षिण – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
सर्व्हेनुसार, महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघात कोणता पक्ष मारणार बाजी?
-मुंबई उत्तर – भाजप
-मुंबई उत्तर पश्चिम – शिवसेना
-मुंबई उत्तर पूर्व – भाजप
-मुंबई उत्तर मध्य – भाजप
-मुंबई दक्षिण मध्य – शिवसेना
-मुंबई दक्षिण – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
-नंदूरबार -भाजप
-धुळे – भाजप
-जळगाव -भाजप
-दिंडोरी -भाजप
-नाशिक -शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
-बुलढाणा – शिवसेना
-अकोला – भाजप
-अमरावती – भाजप
-वर्धा – भाजप
-रामटेक – काँग्रेस
-नागपूर – भाजप
-भंडारा-गोंदिया – भाजप
-गडचिरोली चिमूर -भाजप
-चंद्रपूर – भाजप
-यवतमाळ वाशिम – शिवसेना
-हिंगोली – काँग्रेस
-नांदेड – भाजप
-परभणी – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
जालना – भाजप
-छत्रपती संभाजीनगर – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
-धाराशिव – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
-लातूर – भाजप
-बीड – भाजप
-पालघर – भाजप
-भिवंडी – भाजप
-कल्याण – शिवसेना
-ठाणे – शिवसेना
-रायगड – राष्ट्रवादी काँग्रेस
-मावळ – राष्ट्रवादी काँग्रेस
-रत्नागिरी-सिंधुदुर्ग – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
-पुणे – भाजप
-बारामती – राष्ट्रवादी काँग्रेस
-शिरूर – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार
-अहमदनगर – भाजप
-शिर्डी – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
-सोलापूर – भाजप
-माढा – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार
-सांगली – भाजप
-सातारा – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार
-कोल्हापूर – राष्ट्रवादी काँग्रेस
-हातकणंगले -शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
महाराष्ट्रात कोणत्या टप्प्यात कोणत्या जिल्ह्यात होणार मतदान –
-पहिला टप्पा – 19 एप्रिल – रामटेक, नागपूर, भंडारा- गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर
-दुसरा टप्पा 26 एप्रिल – बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी
-तिसरा टप्पा 7 मे – रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
-चौथा टप्पा 13 मे – नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड
-पाचवा टप्पा 20 मे – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ