मुंबई – शिवेसनेच्या उद्धव ठाकरे गटाकडून रायगड लोकसभा मतदार संघातील उमेदवारी अनंत गिते यांना देण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांनीच नाव जाहीर केले असल्याची माहिती अनंत गीते यांनी माध्यमांना दिली.
तर कोकण पदवीधर मतरादरसंघाचा उमेदवार उद्या जाहीर करण्यात येणार असल्याचे देखील अनंत गीते यांनी म्हटले आहे. त्यामुळे शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागला असल्याचे पुन्हा एका स्पष्ट झाले आहे.
लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांनी सुरु केली आहे. त्यात महाविकास आघाडीच्या जागा वाटपात कोकणातील दोन्ही जागा या उद्धव ठाकरे गटाला मिळाल्या आहेत. त्यामुळे ठाकरे गटाने कोकणातील लोकसभेच्या तयारीला पूर्ण जोमाने सुरुवात केली आहे. सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे या मतदार संघाचे प्रतिनिधीत्त्व करतात.
माझी उमदेवारी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे. त्यांनी दिलेल्या निर्देशानुसार मी आता लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागलो आहे. मी ही लोकसभा निवडणूक लढवणार असून विजय मिळवण्याचा विश्वास देखील अनंत गीते यांनी व्यक्त केला आहे. तसेच आगामी कोकण पदवीधर मतदारसंघाचा उमेदवार उद्धव ठाकरे उद्या जाहीर करणार असल्याची माहिती देखील गीते यांनी दिली आहे. दरम्यान, 2024 मध्ये देशात लोसभेसाठी निवडणूक पार पडणार आहे.