Maharashtra First Phase Voting : देशात लोकसभा निवडणुक 2024च्या पहिल्या टप्प्यातील मतदान शांततेत पार पडले. 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 102 जागांवर सायंकाळी 5 वाजेपर्यंत चांगले मतदान झाले. महाराष्ट्रात केवळ 54.85 टक्के मतदान (5 वाजेपर्यंत) झाल्याने राज्यातील लोक मतदानासाठी उदासीन असल्याचे दिसून येत आहे.
#LokSabhaElections2024 | 77.57 % voter turnout was recorded in West Bengal Lok Sabha elections and 46.32 % in Bihar, an average of 59.71 % in the first phase till 5 PM. pic.twitter.com/xazUSvNmvt
— ANI (@ANI) April 19, 2024
महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात गडचिरोली, भंडारा -गोंदिया, नागपूर, चंद्रपूर आणि रामटेक अशा पाच लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडले.
सर्व 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील मतदान टक्केवारी पहा (सायंकाळी 5 वाजेपर्यंतची आकडेवारी)
पश्चिम बंगाल: 77.57%
त्रिपुरा: 76.10%
पुडुचेरी: 72.84%
आसाम: 70.77%
अरुणाचल प्रदेश: 63.26%
अंदमान आणि निकोबार: 56.87%
बिहार: 46.32%
उत्तर प्रदेश: 57.54%
उत्तराखंड: 53.56%
छत्तीसगड: 63.41%
जम्मू आणि काश्मीर: 65.08%
लक्षद्वीप: 59.02%
मध्य प्रदेश: 63.25%
महाराष्ट्र: 54.85%
मणिपूर: 67.46%
मेघालय: 69.91%
मिझोरम: 52.62%
नागालँड: 55.75%
राजस्थान: 50.27%
सिक्कीम: 67.58%
तामिळनाडू: 62.02%
वरील मतदानाची टक्केवारी पाहता इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात खुप कमी मतदान झाल्याचे दिसून येते. महाराष्ट्रानंतर बिहार, उत्तराखंड, राजस्थान, मिझोराम, येथे कमी प्रमाणात मतदान झाले आहे.
महाराष्ट्रात या मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यातील मतदान –
महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी या मतदारसंघात 26 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.