पवळे, पारखी, गाभणेची निवड : तालुका निवड चाचणी कुस्तीस्पर्धा उत्साहात
पिरंगुट- हिंजवडी (ता. मुळशी) येथे म्हातोबा क्रीडा संकुलात झालेल्या मुळशी तालुका निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत गादी विभागातून पिरंगुटचा विक्रम पवळे, तर माती विभागातून माणचा विक्रम पारखी तसेच कुमार गटातून युवराज गाभणे यांची निवड झाली.
या स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेते मल्ल जिल्हा निवड चाचणी स्पर्धेसाठी मुळशी तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन मुळशीचे युवा नेते राजाभाऊ हगवणे यांच्या हस्ते झाले. तर बक्षीस वितरण शिवसेनेचे संपर्कप्रमुख सत्यवान उभे, जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर, तालुकाप्रमुख संतोष मोहोळ, रूस्तूम ए हिंद अमोल बुचडे, युवासेनेचे जिल्हाधिकारी अविनाश बलकवडे, दत्तात्रय साखरे, नामदेवराव जांभूळकर, बबन साखरे, दिलीप हुलावळे आदि उपस्थित होते. स्पर्धेचे आयोजन ग्रामपंचायत सदस्य नागेश साखरे, जीवन साखरे, संजय जांभुळकर, लाल साखरे व हिंजवडी ग्रामस्थांनी केले होते. बाबा लिमण यांनी निवेदक म्हणून काम पाहिले.
वजनगट निहाय विजेते (गावाचे नाव)
बालगट – 25 किलो : सुशांत गोळे (पिरंगूट), 28 किलो : आदेश माझीरे (भूकूम) 32 किलो : मल्हार लेणे (कासारसाई), 35 किलो : दिनेश मालपोटे (कातरखडक), 38 किलो : करण गुंजले (भूकूम), 42 किलो : वेदांत झुंजुरके (आंदगाव).
कुमार गट – 45 किलो : तिलक चिचवडे (भूगाव), 48 किलो : रोहित खेंगरे (खांबोली), 57 किलो : ऋतीक पोळेकर (मारणेवाडी), 55 किलो : अजिंक्य ववले (भरे), 60 किलो : मंथन मराठे (भूकूम), 65 किलो : आकाश शितोळे (लवळे), 71 किलो : शिवाजी वाकळे (हिंजवडी), 80 किलो : ओम दगडे (बावधन), 92 किलो : आदित्य सागळे (भूगाव), 110 किलो : युवराज गाभणे (अंबडवेट).
वरिष्ठगट – (गादी विभाग) – 57 किलो : अभिषेक जाधव (कासरसाई), 61 किलो : कौशल मातेरे (घोटावडे), 65 किलो : प्रज्वल गोळे (पिरंगुट), 70 किलो : अनिकेत गुगळे (लवळे), 74 किलो : आकाश कुदळे (लवळे), 79 किलो : प्रज्वल उभे (कोळावडे), 86 किलो : ऋषीकेश सुतार (कासारअंबोली), 92 किलो : अक्षय साखरे (हिंजवडी), 97 किलो : आनंद मोहोळ (मुठा), 86 ते 125 किलो : विक्रम पवळे (पिरंगुट).
(माती विभाग) – 57 किलो : शुभंम म्हस्कूटे (भूकम), 61 किलो : औदुंबर शेळके (मांदेडे), 65 किलो : आकाश पाडाळे (म्हाळुंगे), 70 किलो : प्रदीप वाळवे (भूगाव), 74 किलो : विशाल रानवडे (नांदे), 79 किलो : उमेश जाधव (नेरे), 86 किलो : ऋषीकेश उणेचा (भूगाव), 92 किलो : सौरभ शिंदे (नेरे), 97 किलो : आकाश रानवडे (नांदे), 86 ते 125 किलो : विक्रम पारखी (माण).