पुणे – केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या व्यापार आणि उद्योग संवर्धन विभागाच्या वतीने राज्यांच्या स्टार्टअप रँकिंग कामगिरीच्या क्रमवारीत महाराष्ट्राने टॉप परफॉर्मर म्हणून नावलौकिक मिळविला आहे. या निकालाची घोषणा केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केली. यावेळी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रमोद शिंदे, सहायक व्यवस्थापक अमित कोठावदे व विवेक मोगल यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या राज्यांच्या स्टार्टअप रँकिंग क्रमवारीत महाराष्ट्र राज्य टॉप परफॉर्मर म्हणून नावारूपाला आले आहे. अन्य काही रँकिंगमध्येही महाराष्ट्र राज्य पहिल्या स्थानावर आहे. महाराष्ट्र राज्य सरकार स्टार्टअप इको सिस्टमला अधिक बळकट करण्यासाठी अनेक उपाययोजना राबवत आहे.
यामध्ये स्टार्टअपसाठी वित्तीय सहायता, प्रशिक्षण आणि सल्ला सेवा, स्टार्टअप्ससाठी सुविधा उपलब्ध करून देणे आदींचा समावेश आहे. राज्य सरकारने स्टार्टअप्ससाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीचा वापर स्टार्टअप्सना कर्ज, भांडवल गुंतवणूक आणि अनुदान देण्यासाठी केला जात आहे.