महाड दुर्घटना : बिल्डर व इतर दोषींवर गुन्हा दाखल

महाड – महाड शहरातील काजळपुरा भागात असलेली तारकि गार्डन ही पाच मजली इमारत सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कोसळली. यामध्ये २ जणांचा मृत्यू झाला असून १८ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाड इमारत दुर्घटनेप्रकरणी प्रशासनाने तात्काळ कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या इमारतीचे बिल्डर त्याच्यासोबत  तत्कालीन मुख्याधिकारी, वास्तुविशारद, नगरपालिका इंजिनिअर आणि आरसीसी कन्सल्टन्स अशा पाच जणांवर गुन्हे दाखल केले आहे. बिल्डरला अटक करण्यासाठी पथकही रवाना झाले आहे.

चार वर्षांपूर्वी तळोजा येथील पटेल आणि युनूस शेख या बिल्डर्सनी या पाच मजली इमारतीचे बांधकाम केले आहे. या इमारतीमध्ये सुमारे पंचेचाळीस ते सत्तेचाळीस फ्लॅट असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून ही इमारत हालत असल्याची तक्रार रहिवाशांनी बिल्डरकडे केली होती. मात्र या तक्रारींकडे त्यांनी दुर्लक्ष केले होते.

दरम्यान, दुर्घटनेची माहिती मिळताच जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क साधून दुर्घटनेत मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना आणि जखमींना योग्य ती शासकीय मदत देण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.