Madhav Bhandari’s Son Tweet । भाजप पक्षात विरोधी पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांची ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्ष प्रवेश केला. पक्ष प्रवेश केलेल्या नेत्यांना भाजपने निवडणुकीचे तिकीट दिले, यावरून विरोधकांनी टीकाही केली. यावरून भाजपमधील निष्ठावंत नेत्यांच्या मनातील खदखद अनेकदा समोर आली आहे. अशात पुन्हा एकदा भाजप नेत्यांच्या मुलाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या वडिलांबाबत माहिती दिली आहे.
This is a deeply personal post, and it is my personal thought process.
Not many know that I am @Madhavbhandari_ (Madhav Bhandari, Vice President of BJP Maharashtra) son.
Today, I want to write about my father.
My father joined the Jansangh/Janata Party in 1975, a few years… pic.twitter.com/SHMzOtwFHn
— Chinmay Bhandari (@iTsChinmay) February 15, 2024
भाजपाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष माधव भांडारी यांचे पुत्र चिन्मय भांडारी यांची एक पोस्ट चर्चेत आली आहे. चिन्मय भांडारी याने पोस्टमध्ये वडिलांचा राजकीय प्रवास लिहिला आहे,’ माधव भांडारींचं नाव आजपर्यंत १२ वेळा विधानसभा किंवा विधानपरिषद उमेदवारीसाठी चर्चेत आलं, पण बाराही वेळा त्यांना तिकीट मिळालं नसल्याची खंत या पोस्टमध्ये मांडण्यात आली आहे.’
चिन्मय भांडारी याने पुढे वडिल अर्थात माधव भांडारी यांच्या आजपर्यंतच्या राजकीय प्रवासाविषयी आणि त्यांनी पक्षासाठी केलेल्या संघर्षाविषयी सांगितलं आहे. त्याचबरोबर माधव भांडारी यांनी आयुष्यभर पाळलेल्या तत्वांविषयीही त्यांनी नमूद केलं आहे.
‘मी माझ्या आयुष्यात १२ वेळा त्यांचं नाव विधानसभा किंवा विधानपरिषद निवडणुकीच्या चर्चेत आल्याचं पाहिलं आहे. आणि एकदाही त्यांना उमेदवारी मिळाली नाही. मला आजघडीला नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा कोणताही अधिकार नाही. मला ते करायचंही नाही. कारण माझ्या वडिलांप्रमाणेच माझाही त्यांच्यावर विश्वास आहे. पण मला या सगळ्यातून वारंवार आशाही वाटते आणि त्याच्या वेदनाही होतात. पुन्हा पुन्हा”, अशा शब्दांत चिन्मय भांडारी यांनी पोस्टमध्ये खंत व्यक्त केली आहे
हेही वाचा
Siddharth Malhotra । हेलिकॉप्टरमधून सिद्धार्थ मल्होत्राने मारली ‘उडी’
मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा ; म्हणाले,”जुन्या कुणबी नोंदी असलेल्यांना…”