मेड इन इंडिया अ‍ॅप वापरण्यात भारतीयच मागे! भारतीय बनावटीच्या ‘या’ अ‍ॅपने गुंडाळला गाशा

सोशल मीडियावर जरी भारतीय वापरकर्ते जोरात मेड इन इंडिया सोशल मीडियाची मागणी करताना  दिसतात,  पण प्रत्यक्षात मेड इन इंडिया अ‍ॅप वापरण्यात भारतीय वापरकर्तेच मागे आहेत. याचे ताजे उदाहरण म्हणजे हाइकचा स्टिकर चॅट अ‍ॅप, जो अवघ्या दोन वर्षातच बंद झाला आहे.  

ऍपचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी केविन भारती मित्तल यांनी ट्वीटद्वारे याला दुजोरा दिला आहे.  हाइक स्टिकर चॅट ऍपला हाइक अ‍ॅप या नावानेही ओळखले जाते. 

काही दिवसांपूर्वी मित्तल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, हायकॉम अ‍ॅप आणि जानेवारी 2021 मध्ये हाइक अ‍ॅप बंद होईल, तथापि हायकमोजी आणि हाइकच्या अन्य सेवा सुरूच राहतील.  सुरुवातीला, हाइकचा  वापर कोट्यावधी लोकांनी केला आणि प्रत्येक वापरकर्ता हाइक अ‍ॅपला 35 मिनिटांचा वेळ देत होता, परंतु अ‍ॅप कंपनीच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अयशस्वी झाला.

भारतीय मेसेजिंग अ‍ॅप हाइक अ‍ॅप स्टोअरमधून काढून टाकण्यात आला आहे.  भारतात व्हॉट्सअ‍ॅपशी स्पर्धा करण्यासाठी हे अ‍ॅप सुरू करण्यात आले होते.  याला जपानच्या सॉफ्टबँक समूहानेदेखील अर्थसहाय्य दिले होते.  

याव्यतिरिक्त, चीनच्या वेचॅट ऑपरेटर टेंन्सेंट होल्डिंग्जनेही दरवाढीसाठी पैसे गुंतविले.  भारती एअरटेलचे प्रवर्तक सुनील भारती मित्तल यांचा मुलगा केविन भारती मित्तल यांनी हे अ‍ॅप सुरू केले होते.

या अ‍ॅपमध्ये वापरकर्त्यांचा डेटा सुरक्षित असल्याचे कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले.  त्यांना हवे असल्यास ते डाउनलोड करू शकतात.  त्यांनी असेही म्हटले आहे की, हाइकमोजी त्याच्या दोन नवीन अ‍ॅप व्हिब आणि रशसह उपलब्ध असेल.  रश हा एक गेम अ‍ॅप आहे ज्यावर आपण कॅरम आणि लुडोसारखे गेम ऑनलाइन खेळू शकता.

हाइक स्टिकर चॅट अ‍ॅप एप्रिल 2019 मध्ये हाइक कंपनीने लाँच केले होते.  या हाइक स्टिकर चॅट अ‍ॅपवर 40 भारतीय भाषांमध्ये 30,000 हून अधिक स्टिकर्स आहेत.  डिसेंबर 2019 मध्ये, या अ‍ॅपच्या साप्ताहिक सक्रिय वापरकर्त्यांची संख्या 20 लाखांच्या पुढे गेली होती.  

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.