वाघोली (पुणे) – वाघोलीचे माजी ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र ज्ञानेश्वर सातव यांची शिवसेना युवासेनेच्या पुणे जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिरूर लोकसभा मतदार संघातील पदाधिकारी जाहीर करण्यात आले आहेत. शिवसेना नेते खा. संजय राऊत, शिवसेना सचिव खा. अनिल देसाई, रवींद्र मिर्लेकर, माऊली कटके यांनी या निवडी जाहीर केल्या आहेत. मच्छिंद्र सातव यांची युवसेना जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्यावर शिरूर, हवेली तालुक्यासह खेड, हडपसर विधानसभा मतदार संघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सातव यांनी शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेली आंदोलने व राजकीय, सामाजिक विषयांमध्ये हिरहिरीने सहभाग घेतला आहे. शिवसेना-युवासेनेची ध्येय धोरणे व कार्यक्रम राबवून एकनिष्ठेने काम करणार असल्याचे सातव यांनी यावेळी सांगितले.