वाघोली (पुणे) – भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र राज्याच्या कार्यकारिणी सदस्यपदी आव्हाळवाडी येथील भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते गणेश कुटे यांची निवड करण्यात आली आहे.
भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी कार्यकारिणी जाहीर केली असून यामध्ये पुणे ग्रामीण मधून एकमेव गणेश कुटे यांचा महाराष्ट्राच्या कार्यकारणीमध्ये समावेश करण्यात आला आहे. हवेली तालुक्यामध्ये भाजपचे संघटन मजबूत करण्यामध्ये महत्वाची भूमिका असणारे व भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून कुटे यांची ओळख आहे. त्यांनी भाजप जिल्हा उपाध्यक्ष व हवेली तालुकाध्यक्षपदी काम पहिले आहे. पक्षातील योगदान पाहता त्यांची महाराष्ट्राच्या कार्यकारिणीमध्ये निवड करण्यात आली आहे. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी व वाढविण्यासाठी काम करणार असल्याचे गणेश कुटे यांनी यावेळी सांगितले.