डोर्लेवाडी (प्रतिनिधी) : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे कै. गजाननराव भिमराव देशपांडे माध्यमिक विद्यालय बारामती विद्यालयाचा उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल ९०.६७ टक्के लागला आहे. विद्यालय बारामतीत गुणवत्तेमध्ये अववल ठरल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षक वर्गाचा देखील सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
विद्यालयाचे प्रथम तीन क्रमांक –
कला शाखा – कु. स्नेहा गोरख शिळीमकर ७४%, कु. नेहा बंडू शेळी शिळीमकर ७०.१५%, अजय संतोष माने ६७.५३%
विज्ञान शाखा – श्रीयश शेखर जाधव ७३.०७%, कु. श्रुती शेखर जाधव ६६.१५ %, कु. वैष्णवी सुरेश कांबळे ६१.५३
वाणिज्य शाखा – क्षितिजा प्रसन्न व्होरकाटे ८०%, शुभांगी मिनीनाथ साबळे ७२.६१%, ओम गोपाल हेंद्रे ६३.३८ %
सर्व यशस्वी विद्यार्थी, प्राध्यापक यांनी निकालाची उज्वल परंपरा कायम ठेवल्याबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक शेखर धायगुडे, उपमुख्याध्यापिका मायावती रणपिसे, पर्यवेक्षक उमेद सय्यद, धनंजय मेळकुंदे, रोहिणी गायकवाड यांनी अभिनंदन केले. संस्थेच्या वतीने यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.