पुणे (प्रतिनिधी) – सॅनफ्रान्सिसकाे वरुन पुणे विमानळावर येणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमान प्रवासात पुण्यात राहणाऱ्या एका प्रवासी महिलेची दीड लाख रुपयांचे साहित्याची चाेरी झाली आहे. याप्रकरणी ४५ वर्षीय महिलेने याबाबत येरवडा पाेलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
त्यानुसार पाेलीसांनी एअर फ्रांस कंपनीतील एका अज्ञात कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार महिला ही डायटेशीयन असून त्यांचे मुलीचा क्रमांक सॅनफ्राॅन्सिसकाे येथील नामांकित महाविद्यालयात लागला आहे. मुलीला सॅनफ्रान्सिस्काेला साेडून त्या परत पुण्यात येत असताना त्यांनी त्याठिकाणी काही माैल्यवान वस्तूंची खरेदी केली हाेती.
परंतु विमान प्रवासात त्यांचे बॅगेत असलेले साहित्य कपडे, परफ्युम, गिफ्ट, चाॅकलेट व इतर साहित्य लंपास झाले. सॅनफ्रान्सिस्काे वरुन ते पॅरिस मार्ग मुंबई व पुण्यात आले हाेते. त्यावेळी त्यांचे दाेन बॅगापैकी एक बॅक चाेरी झाल्याचे पुणे विमानतळावर आल्यानंतर उघडकीस आले. त्यामुळे त्यांनी याबाबत येरवडा पाेलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.