मुंबई – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात प्रसिद्ध करत 390 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अर्ज दाखल करण्यासाठी 25 ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली होती.
एमपीएससीकडून अर्ज दाखल करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. उमेदवार आता राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करु शकतात. 390 पदांसाठी 2 जानेवारी 2022 ला एमपीएससीकडून राज्य सेवा पूर्व परीक्षा आयोजित केली जाईल. अर्ज दाखल करण्यास मुदतवाढ मिळाल्याने विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
एमपीएससीने आज नवीन परिपत्रक काढत अर्ज दाखल करण्यास मुदतवाढ दिल्याचे जाहीर केले आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 करीता अर्ज सादर करण्यास दिनांक 31 ऑक्टोबर 2021 रोजी 23:59 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. एकूण 20 संवर्गातील 390 पदांची जाहिरात आली आहे. विद्यार्थ्यांना विहित मुदतीत अर्ज दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले.
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. मुख्य परीक्षा दिनांक 7, 8 व 9 मे, 2022 रोजी आयोजित करण्यात येईल. 2021 च्या राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी अर्ज दाखल करण्यास 5 ऑक्टोबर दुपारी 2 वाजल्यापासून होणार आहे. अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिनांक 31 ऑक्टोबर आहे.