नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने आपल्यासाठी 7 हा नंबर खूप लकी असल्याचे सांगितले आहे. माझा न्युमेरोलॉजीवर खूप विश्वास आहे. 7 क्रमांकाशी निगडीत प्रत्येक गोष्ट मला भावते, त्यामुळेच क्रिकेट खेळतानाही मी 7 क्रमांकाची जर्सी घालतो असेही धोनीने स्पष्ट केले आहे.
धोनीची जन्म तारीखही 7 आहे. 7 जुलै 1981 साली त्याचा रांचीमध्ये जन्म झाला. तारीख व महिना दोन्ही 7 असल्याने त्याला हाच क्रमांक आपल्यासाठी सर्वात लाभदायक असल्याचा विश्वास आहे. त्याच्या ताफ्यातील अनेक मोटारी व दुचाकींमधील जवळपास 90 टक्के वाहनांचे क्रमांक 7 आहेत.
क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यावर पहिला करार त्याने एका स्मार्टफोनच्या कंपऩीशी केला होता. या करारावर जेव्हा त्याने स्वाक्षरी केली त्या दिवशीही 7 तारीखच होती. इतकेच नाही तर हा करार सकाळी 7 वाजता व 7 वर्षांसाठी केला. इतक्या दीर्घ मुदतीसाठी करार करणारा धोनी हा क्रिकेटसह सर्व क्रीडा विश्वातील पहिलाच व एकमेव खेळाडू ठरला.