लव्ह-सेक्‍स-धोका; तब्बल पाच वर्षे शारीरिक संबंध ठेवून शिक्षिकेला फसवलं

पुणे – फेसबुकवरुन ओळख झाल्यानंतर तब्बल पाच वर्षे प्रेमसंबंध निर्माण होऊन पाच वर्षे शारीरिक सबंध ठेवले. यानंतर मात्र विवाहास नकार देऊन एका तरुणीची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी एका विवाहित व्यक्तीवर हडपसर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका 36 वर्षीय तरुणीने दिलेल्या तक्रारीनूसार तुषार हनुमंत धुमाळ ( गणेश कॉलनी, काळेपडळ, हडपसर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, फिर्यादी शिक्षीका असून आरोपी तुषार हा वकिल आहे. त्यांची फेसबुकच्या माध्यमातून 2016 मध्ये ओळख झाली होती. यातून त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले.

तुषार हा विवाहित होता, मात्र त्याने घटस्फोट झाल्यावर विवाह करतो असे आश्‍वासन फिर्यादीला दिले होते. लग्नाच्या आमिषाने त्याने वेळोवेळी स्वत:च्या घरी व शहरात इतर ठिकाणी फिर्यादीबरोबर शारिरीक संबंध निर्माण केले. वर्षामागून वर्षे निघुन गेली मात्र तो सातत्याने विवाहस नकार देत होते. त्याने फिर्यादीस फेसबुकच्या माध्यमातून बदनामी करण्याची धमकिही दिली. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड करत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.