नगर, (प्रतिनिधी) – शहरातील बहुचर्चित नगर अर्बन बँक च्या घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी सीए विजय मर्दा ची लूक आउट प्रस्ताव ब्युरो ऑफ इमिग्रेशन गृह मंत्रालय भारत सरकार दिल्ली येथे पाठविण्यात आला होता.
या प्रस्तावास मंजुरी मिळाली असून, त्यामुळे आता भारतातील सर्व विमानतळ व समुद्री मार्गेचे बंदर येथे लुक आउट नोटीस जारी करून आरोपीचा शोध घेतला जाणार आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी नगर अर्बन बँक मुख्य कर्ज तपासणी अधिकारी आरोपी मनोज वसंतलाल फिरोदिया व कर्जदार प्रविण सुरेश लहारे याला अटक केल्यानंतर आता जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,
अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी मिटके यांनी यातील मुख्य आरोपी सीए विजय मर्दा ची लूक आउट प्रस्ताव ब्युरो ऑफ इमिग्रेशन गृह मंत्रालय भारत सरकार दिल्ली येथे पाठवला होता. त्याला आज मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता सर्व विमानतळ व समुद्री मार्गेचे बंदर येथे आरोपी मर्दा याची लुक आउट नोटीस जारी करून त्याचा शोध घेतला जाणार आहे.