जम्मू – जम्मू काश्मीरमधील माजी मंत्री बाबू सिंग यांच्याविरोधात हवाला प्रकरणी लुक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. हवाला व्यवहारांमध्ये त्यांचे नाव संशयित म्हणून पुढे आल्यानंतर बाबू सिंग हे भूमिगत झाले आहेत, असे अधिकाऱ्यांनी आज सांगितले.
पोलिसांनी हवाला व्यवहार प्रकरणी गुरूवारी मोहम्मद शरीफ शाह या व्यक्तीला अटक केली आणि त्यांच्याकडून हवालाचे 7 लाख रुपये जप्त केले. हे पैसे जम्मू जिल्ह्यातील घुसखोरांना मदत म्हणून दिले जाणार होते. या कारवाईनंतर बाबू सिंग भूमिगत झाले, असे पोलिसांनी सांगितले.
बाबू सिंग यांच्याविरोधात जम्मूच्या वरिष्ठ पोलीस अधिक्षकांनी जारी केली. बाबू सिंग देशाबाहेर पळून जाऊ नये म्हणून जम्मू काश्मीर पोलिसांनी या संदर्भात विविध ठिकाणच्या विमानतळांनाही सतर्क केले आहे. बाबू सिंग यांच्याशी संबंधित विविध राज्यांमधील ठिकाणांवरही पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले आहे. बाबू सिंग जरी फरार असले तरी त्यांना शोधून काढले जाईल, असा विश्वास पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी शुक्रवारी सांगितले.
या प्रकरणी आणखीन तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेम्यात आले आहे.
बाबू िंसग यांनी इंटरनॅशनल डेमोक्रॅटिक पार्टी नावाने स्वतःचा पक्ष स्थापन केला होता. 2002 मध्ये ते कथुआ येथून विधानसभेत निवडून गेले होते. कॉंग्रेस – पीडीपी सरकारच्या मंत्रिमंडळात त्यांचा समावेश करण्यात आला होता.