खेड शिवापूर(प्रतिनिधी) – खेड शिवापूर (ता. हवेली) येथे पुणे-सातारा रस्त्यालगत बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते. या शर्यतींमध्ये तब्बल 350 बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या. या शर्यतींमुळे पुणे-सातारा रस्त्याला जत्रेचे स्वरूप तयार झाले होते.
खेड शिवापूर (ता. हवेली) येथे शिवसेना जिल्हाप्रमुख केसरी बैलगाडा शर्यतीचे मंगळवारी (दि. 5) आयोजन करण्यात आले होते. पुणे जिल्हाप्रमुख शिवसेना रमेश कोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली या शर्यती झाल्या. सकाळी 9 वाजता गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, मा. मंत्री तथा शिवसेना पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन अहिर, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या हस्ते शर्यतीचे उद्घाटन झाले.
या शर्यतीत शंभू बाजी ग्रुप खडकवासला (प्रथम), पार्वती ज्वेलर्स (द्वितीय), मोत्या ग्रुप पथरवादी (तृतीय), गुड्डीरतन महातरे मुंबई (चतुर्थ) यदणेश तरस (पाचवा), नंदया रायबान ग्रुप (सहावा) विजेते झाले. खेड शिवापूरचे सरपंच अमोल कोंडे, उद्योजक सागर आरडे, गोरख कोंडे, राहुल कोंडे यांसकडून तब्बल एक लाखाचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस ठेवण्यात आले होते, तर श्रीपाद कोंडे व रुपेश कोंडे यांच्यातर्फे ढाल देण्यात आली.
उद्योजक सचिन कोंडे, गजुशेठ कोंडे, संतोष कोंडे, अशोक बांदल यांच्याकडून 71 हजार रुपयांचे द्वितीय, विविध विकास कार्यकारी सोसायटीचे संचालक राजेंद्र कोंडे यांच्याकडून 51 हजार रुपयांचे तृतीय क्रमांकाचे आणि सतीश कोंडे यांच्याकडून ढाल, गणेश पायगुडे यांच्यातर्फे 31 हजार रुपयांचे चतुर्थ क्रमांकाचे, विशाल कोंडे यांसकडून ढाल, राईसभाई यांच्यातर्फे 21 हजार रुपयांचे पाचवे क्रमांकाचे बक्षीस व योगेश रामचंद्र कोंडे यांच्याकडून ढाल, मोहित निगडे यांच्याकडून 11 हजार रुपये सहावा क्रमांकाचे बक्षीस आणि श्रीपाद व रुपेश यांच्याकडून ढाल बक्षीस देण्यात आली. मंडप-साउंड व्यवस्था माजी उपसरपंच स्वप्नील कोंडे, विद्यमान उपसरपंच राजेंद्र कोंडे आणि दिलीप कोंडे यांनी केले.