वाघोली -लोणीकंद (ता. हवेली) पोलीस ठाण्याला स्मार्ट पोलिसिंग अंतर्गत आयएसओ मानांकन प्रमाणपत्र देऊन नुकतेच गौरविण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
दाखल गुन्ह्यांचे प्रमाण, वाघोलीतील वाहतूक कोंडी, 1 जानेवारीला होणारी गर्दी, सामाजिक सलोख्याचे वातावरण राखणे, वाढत्या लोकसंख्येमुळे वाढणारा ताण लक्षात घेता पुणे ग्रामीण पोलीस दलातील सर्वाधिक व्यस्त पोलीस ठाणे म्हणून लोणीकंद पोलीस ठाण्याचा समावेश होतो.
करोना परिस्थितीतही येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून स्मार्ट पोलिसिंग केली जात असल्याने ठाण्याला गौरविण्यात आले आहे.