मुंबई : बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. ते त्यांच्या काळात तर सुपरस्टार होतेच पण आजही अमिताभ बच्चन हिंदी चित्रपटसृष्टीवर राज्य करतात. इंस्टाग्रामवर अमिताभ यांनी जुन्या आठवणींना उजाळा देणारी पोस्ट शेअर केली आहे.अमिताभ बच्चन यांनी ब्लॅक अँड व्हाईट फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत थिएटरबाहेर लोकांनी तिकीट मिळवण्यासाठी लांबच लांब रंग लावल्याचे दिसत आहे.
अमिताभ ना आठवले पुराने दिन
खरे तर ‘डॉन’ चित्रपटाची तिकिटे घेण्यासाठी लोक एवढ्या लांब रांगेत उभे आहेत. इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत अमिताभ बच्चन यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, “माझ्या ‘डॉन’ चित्रपटाची अॅडव्हान्स बुकिंग आणि ते म्हणाले, होय लोकांची रांग खूप लांब आहे. हा चित्रपट 1978 साली रिलीज झाला होता. तसेच ‘कस्मे वादे’ ‘ , ‘त्रिशूल’, ‘मुकद्दर का सिकंदर’ आणि ‘गंगा की सौगंध’ देखील याच वर्षी प्रदर्शित झाले. एका वर्षात पाच ब्लॉकबस्टर. त्यापैकी काही चित्रपटगृहांमध्ये 50 आठवडे चालले. तेही दिवस काय होते!” असा आशयाची पोस्ट त्यांनी सोशल माडियावर केली आहे.
View this post on Instagram
अमिताभ बच्चन हे ‘बिग बी’ म्हणून प्रसिद्ध आहेत. ते ७० च्या दशकातील हिंदी चित्रपटसृष्टीचे सम्राट राहिले . त्यांना ‘अँग्री यंग मॅन’ ही म्हंटल गेलं . ‘जंजीर’ चित्रपटात ते अँग्री यंग मॅन च्या भूमिकेत दिसले होते. 70 आणि 80 च्या दशकात अमिताभ बच्चन यांनी चित्रपटसृष्टीत आपले पाय चांगलेच रोवले होते. या वयातही ते बॉलिवूड इंडस्ट्रीत सक्रिय दिसत आहेत. एव्हढेच नाही तर आजही ते तेवदहाच दमदार अभिनयही करतात.