वाघोली: आव्हाळवाडी येथील सुदाम सोसायटीच्या अध्यक्षपदी तुषार कुटे यांची तर उपाध्यक्षपदी सूर्यकांत आव्हाळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. भाजप नेते गणेश कुटे यांची सुदाम विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या संचालक पदी यापूर्वी बिनविरोध निवड झाली आहे.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पुणे जिल्हा भाजपचे संघटन सरचिटणीस संदीप सातव, हवेली तालुका भाजपचे उपाध्यक्ष प्रदीप सातव,धर्मवीर संभाजीराजे सोसायटीचे माजी अध्यक्ष राजूनाना शिवले,ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संतोष शिवले,माजी उपाध्यक्ष शांताराम शिवले, रयत शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष संदीप शिवले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी सोसायटीच्या संचालकपदी निवड झालेले दशरथ आव्हाळे, बाबुराव आव्हाळे, बंडू कुटे, किशोर उंद्रे,सागर कुटे, कुसुम कुटे, लिलाबाई आव्हाळे, महादेव दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.