Vasant More । मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांनी मनसे पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मात्र अद्याप त्यांनी कोणत्या पक्षात प्रवेश करणार याबाबत स्पष्ट सांगितलेले नाही. मात्र मागील काही दिवसांपासून वसंत मोरे पुण्यातून लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगत आहेत.आजही ते निवडणूक लढवण्यावर ठाम असून ‘मी एकला चलो रे’च्या भूमिकेवर ठाम आहे, असे विधान वसंत मोरे यांनी केले.
पुणे लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतून काँग्रेसचे विद्यामान आमदार रविंद्र धंगेकर रिंगणात उतरले आहे.तर महायुतीने पुण्याची उमेदवारी माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना जाहीर केली. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मनसेतून बाहेर पडलेले वसंत मोरे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशात मिळालेल्या माहितीनुसार, वसंत मोरे मंगळवारी रात्री मराठा समाजाच्या बैठकीत पोहचले. यावेळी त्यांनी पुण्यातून खासदार होण्यासाठी मराठा समाजाचे सहकार्य मागितले.
Vasant More । सकल मराठा समाजाच्या बैठकीत वसंत मोरेंची हजेरी
‘नुकतीच वसंत मोरे यांनी सकल मराठा समाजाने आयोजित केलेल्या बैठकीला हजेरी लावली. पुण्यात खासदार होण्यासाठी सकल मराठा समाज आणि वंचितने सहकार्य करावे, अशी भूमिका बैठकीत वसंत मोरे यांनी मांडली. मी पुण्यातून १०० टक्के खासदार होणार असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपचे एक राष्ट्रवादीच्या दोन राष्ट्रवादी केल्या. शिवसेनाही दोन केल्या. यामुळे भाजपचा हा प्रकार थांबवण्यासाठी आपण निवडणूक लढवणार आहे. येत्या ७ तारखेला वसंत मोरे मनोज जरांगे यांची भेट घेणार आहेत’
Vasant More । मराठा समाज उमेदवार जाहीर करणार का?
गेल्या काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्येक लोकसभा मतदारसंघात मराठा समाजाची बैठक घेण्याचे आवाहन केले होते. राज्यातील प्रत्येक मतदार संघातून मराठा समाजाने एक उमेदवार द्यावा, त्याबाबतचा निर्णय बैठकीत घेण्याचे त्यांनी म्हटले होते. त्या पार्श्वभूमीवर वसंत मोरे मराठा समाजाच्या बैठकीत गेले. आता त्यांना मराठा समाज उमेदवार जाहीर करणार का? अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
हे वाचलं का ? शिंदे गटाच्या नेत्याने स्पष्टच सांगितलं,’1990 सालापासून आम्ही भाजपचा खासदार निवडून दिलाय…’