Salman Khan | Firing | Supriya Sule : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात एक धक्कादायक बाब समोर येत आहे. सुरुवातीला केवळ हवेत गोळीबार झाल्याची चर्चा होती, मात्र तपासानंतर सलमानच्या घराला लक्ष्य करून गोळीबार करण्यात आल्याचे समोर आले आहे. । Salman Khan | Firing | Bishnoi Gang सलमानच्या घराच्या बाहेरील भिंतीवर गोळ्यांच्या खुणा आढळल्या. यासोबतच सलमानच्या बाल्कनीवरही गोळ्यांच्या खुणा आढळल्या आहेत. या बाल्कनीतून सलमानने त्याच्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. सलमान खान अनेकदा त्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाल्कनीत दिसतो. या बाल्कनीवरही गोळीबार झाला आहे. फॉरेन्सिक टीमला बाल्कनीत गोळ्यांच्या खुणा आढळल्या आहेत. पोलिसांना मिळालेल्या सीसीटीव्हीमध्ये आरोपीने चेहरा झाकलेला असल्याने त्याची ओळख पटवणे कठीण झाले आहे. मुंबई पोलिसांना एक सीसीटीव्ही सापडला आहे, मात्र चित्र अस्पष्ट आहे. पोलीस आता परिसरातील इतर सीसीटीव्ही फुटेज पाहत आहेत. । Salman Khan | Firing | Supriya Sule दरम्यान, आता या संपूर्ण घटनेवर राज्यातील अनेक राजकीय नेते देखील आपली प्रतिक्रिया देत असून, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा अभिनेता सलमान खान याच्याशी फोनवरून संपर्क साधला आहे. अश्यातच, आता शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “घटना घडलेली असेल तर ती चुकीचीच आहे. 2014 पासून 24 पर्यंत एकही जातीय दंगा देशात झाला नाही. एकही बॉम्बस्फोट या देशात आलेला नाही. सर्वसामान्य लोकांनाही कळतं. असं सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या. यावेळी त्या माध्यमांशी सवांद साधत होत्या. । Salman Khan | Firing | Supriya Sule गोळीबाराची जबाबदारी स्वीकारत बिश्नोई गँगची भाईजानला धमकी – या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी स्वीकारली बिश्नोई गँगने स्वीकारली असून यामध्ये बिश्नोई गँगचा हात असल्याचा दावा केला आहे. अनमोल बिश्नोई नावाच्या व्यक्तीने आपण या गोळीबारामागे असल्याचं मान्य केलं आहे. फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत या गँगने याबद्दल खुलासा केला आहे. अनमोल बिश्नोई नावाच्या अकाऊंटवरून या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली आहे. मात्र हे अकाउंट फेसबुक वर सर्च केलं जाऊ शकत नाही. अकाउंटबाबत रिस्ट्रीक्शन्स आहेत. त्यामुळे पोलीस अधिकारी याची सत्यता पडताळून पाहत आहेत.