दौंड – दौंड तालुक्याच्या आजूबाजुच्या तालुक्यात करोनाचे संक्रमण वाढत आहे; परंतु दौंड तालुका असाच अबाधित रहावा, यासाठी दौंड नगरपालिकेच्या वतीने दौंड शहर मंगळवार, दि. 28 ते 30 एप्रिल या कालावधीत पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी मंगेश शिंदे यांनी दिली.
बंदमध्ये सर्व वैद्यकीय सेवा, दवाखाने, मेडिकल तसेच तीनही दिवस सकाळी 7 ते 9 यावेळेत फक्त दूध विक्री सुरु राहणार आहे. तहसीलदार संजय पाटील, मुख्याधिकारी मंगेश शिंदे, निरीक्षक सुनील महाडिक, नगराध्यक्षा शितल कटारिया यांनी हा तीन दिवसीय बंद यशस्वी करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.