इस्रायलमध्ये लॉकडाऊन शिथील

जेरुसलेम – इस्रायलमध्ये करोना साथीमुळे लागू करण्यात आलेले निर्बंध आता शिथीले केले जाऊ लागले आहेत. अर्थकारणाला बळ मिळावे यासाठी लॉकडाऊन शिथील करण्याच निर्णय घेण्यात आला आहे. इस्रायलमह्ये करोनाच्या रुग्णांची संख्या मर्यादित करण्यासाठी सलग तिसऱ्यांदा लॉकडाऊन लागू केला गेला होता.

त्याबरोबरच आता इस्रायलमध्ये लसीकरणालाही सुरुवात झाली आहे. देशातील बहुतेक शाळा आणि महाविद्यालये दोन महिने बंद होती. आता संग्रहालये, ग्रंथालये, मॉल्स आणि बाजारपेठासह सर्वच शैक्षणिक संस्था उघडल्या जाऊ लागल्या आहेत. मात्र विद्यार्थ्यांच्या संख्येबाबत असलेले काही निर्बंध अजूनही लागू असणार आहेत.

मार्चच्या सुरूवातीस संपूर्ण शिक्षण व्यवस्थेचे कामकाज सामान्य होण्याची शक्‍यता आहे. करोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस प्राप्त झालेल्या लोकांसाठी जिम, स्वीमिंग पूल, चित्रपटगृह आणि रेस्टॉरंट्‌स उघडत आहेत.

इस्रायलमध्ये फायझरच्या लसीला परवानगी दिली गेली आहे. तेंव्हापासून आतापर्यंत 93 लाख नागरिकांना पहिला डोस दिला गेला आहे. तर 30 लाख जणांना दुसरा डोसही दिला गेला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.