चेन्नई –आयपीएलच्या लिलावात सर्व संघाचे मिळून तब्बल 6100 कोटी रुपये खर्च झाले आहे. या लिलावात जागतिक क्रिकेटमधील बहुसंख्य स्टार खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या खेळाडूंना आपल्या संघात घेण्यासाठी जवळपास सर्वच संघांनी लिलावात करोडो रुपयांची बोली लावली. याच बोलीची तसेच सर्व संघांनी खर्च केलेली एकत्रीत रक्कम तब्बल 6 हजार 100 कोटी रुपये इतकी प्रचंड आहे.
या लिलावात केवळ 57 खेळाडूंवरच 145 कोटी रुपये खर्च झाले या लिलावात भारताच्या 485 खेळाडूंचा सहभाग होता. त्यांच्यावरच दवळपास 3 हजार 433 कोटी रुपये खर्च झाले आहेत. म्हणजेच पूर्ण रकमेच्या जवळपास 57 टक्के एवढे पैसे भारतीय खेळाडूंना मिळाले आहेत. त्यामुळे या लिलावात भारतीय खेळाडू पैशांच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहेत. या लिलावात सर्वाधिक पैशांच्या यादीत ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे. कारण ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना यावेळी 900 कोटी रुपये मिळाले आहेत. या लिलावात ऑस्ट्रेलियाचे 94 खेळाडू होते.
ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंमध्ये सर्वात जास्त पैसे हे ग्लेन मॅक्सवेलला मिळाले. मॅक्सवेलला या लिलावात रॉयल चॅलेंजर बेंगळूरू संघाने 14.25 कोटी रुपये मोजत आपल्याकडे घेतले. या लिलावात दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
दक्षिण आफ्रिकेचे 56 खेळाडू यावेळी लिलावाच्या यादीत होते. या खेळाडूंना 539 कोटी रुपये मिळाले आहेत. त्यांच्या ख्रिस मॉरिसने यंदाच्या स्पर्धेत विक्रम साकार करताना तब्बल 16.25 कोटी रुपये मिळवले. या यादीत चौथ्या क्रमांकावर वेस्ट इंडिजचे खेळाडू आहे. इंग्लंडच्या खेळाडूंनी आतापर्यंत 285.96 कोटी रुपये कमावले आहेत.