मोठी बातमी : अमरावतीनंतर आता ‘या’ जिल्ह्यात 7 दिवसांचा कडक ‘लॉकडाऊन’

हिंगोली – राज्यात करोनाने पुन्हा एकदा थैमान घालण्यास सुरू केल्याने काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याची वेळ आली आहे. विशेषता, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये करोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर हिंगोलीत 1 मार्च ते 7 मार्चपर्यत असा आठवड्याभराचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर सकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत जिल्ह्यात फिरण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. अत्यावश्‍यक सेवा वगळता हा लॉकडाऊन करण्यात आला आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये 1 मार्चपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील सर्व प्रार्थनास्थळे, मंगल कार्यालय, महाविद्यालयही बंद राहणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिली. यापूर्वी हिंगोलीत रात्री 7 ते सकाळी 7 पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली होती.

हिंगोलीत करोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. अत्यावश्‍यक सेवांमध्ये बॅंका, शासकीय कार्यालये, वृत्तपत्रे, दूध मेडिकल यांना मात्र सूट देण्यात आली आहे.

दरम्यान, अमरावती शहर, अचलपूरमध्ये 7 दिवसांचा लॉकडाऊन आता 8 मार्चपर्यंत वाढवण्यात आला आहे. मात्र असे असतानाही अनेकांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे. दुपारी 3 वाजल्यानंतर विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांविरोधात महसूल विभाग आणि पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. अंजनगाव सुर्जी शहरात कंटेमेन्ट झोन घोषित करण्यात आला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.