…तेव्हा राहुल गांधी सुट्टीवर होते; अमित शहांची टीका

पदुच्चेरी – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी मच्छिमारांसाठी मंत्रालय स्थापन करण्याच्या संबंधात जे विधान केले आहे त्याचा वापर करून भाजपचे नेते अमित शहा यांनी आज त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, दोन वर्षांपुर्वीच केंद्र सरकारमध्ये मच्छिमारांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात आले आहे. हा निर्णय ज्या वेळी घेण्यात आला त्यावेळी राहुल गांधी हे सुट्टीवर होते अशी टिपण्णी त्यांनी केली आहे.

जो नेता चार वेळा लोकसभेचा सदस्य राहिला आहे, त्या नेत्याला देशात स्वतंत्र मच्छिमार मंत्रालय सुरू झाले असल्याची माहिती नाही अशा नेत्याच्या पक्षाला आपण निवडून देणार आहात काय असा सवाल त्यांनी आज येथील एका जाहींर प्रचार सभेत बोलताना केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीहीं याच विषयावरून राहुल गांधींवर निशाणा साधला होता. या देशात मच्छिमारांसाठी स्वतंत्र मंत्रालय सुरू झाले असल्याची माहिती कॉंग्रेस नेत्याला नसणे ही धक्कादायक बाब आहे असे ते म्हणाले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.