लॉकडाऊनमुळे सर्व कामे ठप्प झाली असून बॉलीवूडमधील बऱ्याच चित्रपटांचे शूटिंग रद्द करण्यात आले असून अनेकांचे रिलीज अडकले आहे. यात बॉलीवूडचा खिलाडी अर्थात अक्षयकुमार यांचे सर्वाधिक नुकसान झाले असल्याचे दिसते. अक्षयकुमार त्या कलाकारांपैकी एक आहे जो वर्षभर मेहनत घेत एकाच वेळी अनेक चित्रपटांचे शूटिंग करत असतो. यामुळे अक्षयकुमारला मोठा फटका बसला आहे.
यंदाच्या वर्षात अक्षयकुमारचे 7 चित्रपट प्रदर्शित होणार होते. मात्र, या सर्व चित्रपटांचे प्रदर्शन रखडले आहे. यात पहिला फटका रोहित शेट्टीचा “सूर्यवंशी’ चित्रपटला बसला आहे. हा चित्रपट मार्च महिन्यात प्रदर्शित होणार होता. मात्र, लॉकडाउनमुळे त्याचे प्रदर्शन रद्द करण्यात आले.
याशिवाय अक्षयकुमारचा “लक्ष्मी बॉम्ब’ रिलीज होण्याच्या प्रतीक्षेत आहे. या चित्रपटात अक्षयकुमार पूर्णपणे वेगळ्या अवतारात दिसणार असून अद्याप याच्या प्रदर्शनाबाबत अनिश्चितता आहे. तसेच यंदाच्या वर्षातील मोस्ट अवेटेड असलेला “बेल बॉटम’ वर्षाअखेर रिलीज होणार होता.
तसेच अक्षयकुमार आणि मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार होते. या चित्रपटातून मानुषी बॉलीवूडमध्ये डेब्यू करणार होती. जो दिवाळीला रिलीज होणार होता, पण सध्याच्या परिस्थिती पाहता ते अशक्य आहे.याशिवाय “अतरंगी रे’, “बच्चन पांडे’ आदी चित्रपट अक्षयकुमारने साईन केले आहेत. पण लॉकडाऊनमुळे या सर्व चित्रपटांचे काम ठप्प झाले आहे.