इथेनॉल निर्मितीसाठी साखर कारखान्यांना कर्ज

नवी दिल्ली – तब्बल 185 साखर कारखाने आणि स्वतंत्र इथेनॉल तयार करणाऱ्या उद्योगांना इथेनॉल प्रकल्प उभारण्यासाठी किंवा प्रकल्प विस्तारासाठी 12,500कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध करण्यासाठी अन्न मंत्रालयाने हिरवा कंदील दाखविला आहे.

भारतात पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आणखी वर्षाला 468 कोटी लिटर इथेनॉल तयार करण्याची गरज आहे. यासाठी अन्न मंत्रालय आणि पेट्रोलियम मंत्रालय समन्वयाने काम करीत आहेत.

गेल्या दोन वर्षात सत्तर इथेनॉल उद्योगांना 3,600 कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले आहे. उसाशिवाय शेतीतील तांदूळ आणि मका या पिकाच्या कचऱ्यापासून इथेनॉल बनविण्यास ही चालना देण्यात येत आहे. सध्या भारतात पेट्रोलमध्ये पाच टक्के इथेनॉल मिसळले जाते. हे प्रमाण 20 टक्‍क्‍यांपर्यंत वाढविण्याचा प्रयत्न चालू आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.