लंडन – स्टार फुटबॉलपटू सादिओ माने याने केलेल्या दोन गोलच्या जोरावर लिव्हरपूलने मॅंचेस्टर सिटीला 3-2 असे पराभूत करत एफए करंडक फुटबॉल स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.
येथील वीम्बली स्टेडियमवर झालेल्या या उपांत्य फेरीच्या सामन्यात पहिल्या हाफमध्ये लिव्हरपूलच्या इब्राहिमा कोनाटेने नवव्या मिनिटाला हेडरद्वारे गोल केला व संघाला आघाडी प्राप्त करून दिली. त्यानंतर मानेने 17 व 45 व्या मिनिटाला लागोपाठ दोन गोल केले व संघाला लिव्हरपूलकडे 3-0 अशी आघाडी मिळवून दिली.
दुसरा हाफ सुरू झाल्यानंतर मॅंचेस्टर सिटीच्या जॅक ग्रिलिशने 47 व्या, तर बर्नाडरे सिल्वाने अतिरिक्त वेळेत गोल केला मात्र, लिव्हरपूलने आपला बचाव भक्कम केला व मॅंचेस्टरला आणखी गोल करू दिला नाही व हा सामना जिंकला.